Sunday, September 17, 2017

आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 
मनोहर अंबानगरी टिम तर्फे त्या आठवणींना उजाळा. 


Monday, May 1, 2017

Ambajogai_Manohar Ambanagari_Short film_trailer

अंबाजोगाई सुंदर आहे, मनोहर आहे. 
संस्कृती, कला, साहित्य यांचं वरदान अगदी भरभरून आहे. 
यावर एक सुंदर लघुपट येतोय. त्याचं हे ट्रेलर. 
अंबानगरी तुम्हालाही मनोहर वाटतेय का ? नक्की सांगा. 
तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट करा, आणि जास्तीत जास्त शेयर करा. 

Manohar Ambanagari is an endeavor to showcase the grandeur of Ambajogai city in Maharashtra through a short film.
This city was center of cultural developments around 11th century. Many saints and gurus fell in love of the natural beauty of this place and blessed the land with their sublime art and inspiring literature. 

Please visit manoharambanagarishortfilm Facebook page.
You can contact us at manoharambanagari@gmail.com

Location - Ambajogai, Beed, Maharashtra, India.  

Director - Rahul Narwane

https://www.youtube.com/watch?v=xLiadQeIdpE

Friday, October 28, 2016

HAPPY DIWALI

May this Diwali bring you the utmost in peace and prosperity. 
Thursday, August 18, 2016

निसर्ग आणि मी.

           


                  प्रचंड गलबल्यातून, माणसांच्या अफाट पसाऱ्यातून, चहा सिगारेटच्या वासातून निसटून छान पावसात शांत वाहणाऱ्या नदीच्या पूलावर बसलं कि थोडासा दिलासा 'मनाला'. एखादं सिगारेट जळून झालेलं, पण अर्धवट जळत्या अवस्थेत रस्त्याच्या मधोमध पडलेलं, कुणाच्यातरि पायानं ही उरलेली आग शांत व्हावी या तळमळीत, वाटेवर वाट पाहत बसलेलं कोणाच्यातरि पायाची. . . पायदळी स्वत: ला तुडवून घेण्यासाठी. स्वत: चा अंश मालकाच्या छातीत ठेऊन येण्याचं पाप जाणवतं, पण काय करणार, कामाचं ते . . . म्हणून समाधान मानणारं. आणि अश्या वेळी पावसाच्या सरिने उरलेली आग शांत व्हावी, तसं हे 'मन'. ईच्छा नसताना जळणं, ईच्छा नसताना पोटात प्रचंड विष घेऊन त्या विषाचा धूर नाकातून नाजूक छातीत बसणं, व शेवटी थोटकं होऊन जळून स्वत: ला मुक्त करणं. एवढचं काम मनाचं व सिगारेटचं ही. कित्येक गोष्टी मनाविरूद्धचं करत असतो माणूस.
शांत वाहणाऱ्या नदीकडे पाहून दिवसभर जळलेल्या मनाची शांतता करून झाल्यावर नदीत खॊलवर पाहिलं. अंधार असल्यामुळे व पुलावरून नदीतलं जास्त दिसणं शक्य नसल्यामुळे वरनचं अंदाज घेतला. वाहणं नदीचं काम आहे. पण जर तिच्या मनात आलं . . "थोडा वेळ थांबाव. पाहावं एका जागेवर थांबून, सतत पळत रहाण्यापेक्षा थोडावेळ थांबून श्वास घ्यावा. प्रयत्न केला तर . . " तिनं मला मनातलं बोलल्याचा भास झाला. मला माझ्यासारखं कोणीतरी भेटल्याचा भास क्षणभर आनंद झाला. पण दुसऱ्याचं क्षणी ती बोलली . . "नाही, नाही मी थांबणार नाही. मी थांबूच शकत नाही. माझं वाहणं म्हणजे माझं श्वास घेणं, माझं खळखळणं म्हणजे म्हणजे माझ्या हृदयाची स्पदंण आहेत. मला जगायचं आहे, वाहायचं आहे. कारण मला ओढ आहे, माझ्या साजणाची. त्याला लवकर गाठायाचंय."ती म्हणाली आणि गेली. क्षणभर मला ती फार स्वार्थी वाटली, मला राग आला. मी पाण्यात पहायाचं सोडून दिलं. 'कोणं दिला हिला वाहण्याचा ठेका, सतत तोरा हिचा, तो पाऊस पडतोय म्हणून नखरा हिचा, नाहीतर कोण विचारतंय हिला'. माझी चिडचिड झाली.
             माझ्या चेहऱ्यावर पडणाऱ्या थेंबांनी मी पुन्हा खुललो. मूक्तपणे थेंबांना माझ्या अंगा खांद्यावर घ्यायला लागलो. ते पूर्णपणे बरसण्याचा आनंद घेत होते, मी भिजण्याची कसर सोडत नव्हतो. वाटलं की आकाशातल्या प्रत्येक थेंबांना मी अंगावर घ्यावं, चिंब भिजावं. अंगावर शहारे आले, किती छान, प्रत्येक थेंब न थेंब माझ्यावरनं जातोय, मला भेटून जातोय. मुक्तपणे चक्कर टाकत उंच आकाशात नजर टाकली. अरे हे काय कित्येक थेंब तर त्या विशाल पुलाखालच्या स्वार्थी नदीत पडतायत. पुलावरून उडी घ्यावी, अन नदीचा पूर्ण परिसर अंगाखाली घ्यावा. एक थेंब ही नदीला भेटू नये असं करावं. हं पण शक्यच नाही, स्वार्थी नदी आपल्यापेक्षा जास्त थेंब घेणार. मग एवढेसेच थेंब घेऊन मी काय करू. मग विचार आला, ओजळभर थेंबांनी भरली . . . अन निथळलीपण. मग मी थेंबांना आर्जव केली, 'थांबा. . माझ्यासोबत, मी फार एकटा आहे, चार थेंब आलीपण.. पण क्षणानी ती पण निथळली.
मी दोघांवर ही नाराज होऊन परत माणसांच्या जगात आलो. स्वार्थी, कपटी जगात परत निघालो. मागणं दोघेही आली, म्हणाली "रागावलास आमच्यावर, मी उगाच भावखात 'हो' म्हणालो. दोघेही हसत म्हणाली, 'निसर्गाच्या नियमानुसार पळणं ही बाब गरजेची आहे. सगळ्याचं चं आयुष्यं अविरत चालणार आहे, कोणीचं कोणासाठी थांबणार नाही, तू ही थांबू नकोस. निसर्ग नियमांनूसार जग' म्हणून ते पळाले. मी स्थब्ध ऐकत राहिलो.
             खरंच मनात असूनही थांबू शकत नाही. आयुष्याची मरणाकडे नेणारी सेकंद सुरूच आहेत. मग मी नदीवर का रागावलो. चालणं म्हणजे आयुष्य, जगत राहिलं पाहिजे. खरं आहे. निसर्गाने पुन्हा एकदा मला जगायला शिकवलं.
                                                                                                                                  - २००९

Saturday, November 7, 2015

'शब्दोत्सव' - दिवाळी अंक मुखपृष्ट.

         'शब्दोत्सव' चं हे ११ व वर्ष, दर वर्षी नवीन संकल्पना घेऊन वाचकांना दिवाळी चा साहित्यरुपी फराळ देण्याचं काम अविरत पणे चालू आहे. या वर्षीच्या दिवाळी अंकावर दुष्काळाच सावट आहेच. त्याच्या कारणांची आणि उपायाची चर्चा साहित्यातून लेखात केली आहेच, पण त्याच बरोबर समाजातील अश्या काही असामान्य व्यक़्तिच्या मुलाखती आहेत, जे सर्वात राहूनही वेगळ्या वाटेचे प्रवासी आहेत.   
           चित्र व्यक़्त होण्याचं एक माध्यम आहे. आसपास घडणाऱ्या घटनांचा कळत - नकळत आपल्यावर परिणाम होतच असतो. त्यातून मुक्तता म्हणजे त्याच मांडणं. शेतकऱ्याच्या आत्महत्याच प्रमाण खूप जास्त वाढत आहे, त्या मागचं कारण शोधताना महत्वाचं कारण दुष्काळ सापडतो. निसर्ग नियमच्या विरुद्ध चालायला लागला कि, अश्या घटना घडतात. त्याला बऱ्याच अंशी आपणच जबाबदार असतो. त्या निसर्गाचे चक्र मूळ तीन ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.  
            या चित्रात त्या तीन ऋतू बरोबरच जमीन, आकाश, आणि मधली पोकळी दाखवली आहे. इथे ऐवढाच बदल केला आहे कि, हे सर्व नियम उलट लावले आहे. ज्या प्रमाणे चक्र बदलेले आहे. त्याच प्रमाणे चित्र हि उलट दाखवण्यात आल आहे. मराठवाड्याचा रखरखित पणा चित्राच्या रंगामधून जाणवतो. ब्रट अंबर त्या रखरखित कोरड्या जमिनीचे प्रतिक आहे. आणि पिवळा येथे त्यात आणखीन भर टाकतो. ऐरवी समृद्धीचं प्रतिक असणारा पिवळा येथे अंगावर येतो. उन्हाची असहनशील दाहकता त्यात जाणवते. आकाशात पाणी दिसतेय पण ते जमिनीपर्यंत पोहचत नाही. मध्ये कुठेतरी अडतंय असं वाटत. तीन काळ, तीन ऋतू
च्या पोकळीच्या बाहेर सर्व अंधार आहे. ब्रह्मांड (पृथ्वी) गोल आहे, किंवा ती अंड्याच्या आकाराची आहे 
म्हणून आंडाकार. हे चित्रकराच्या नजरेतून आलेलं विश्लेषण आहे. आपणास आणखीन काही वेगळं/ नवीन काही जाणवलं तर त्या चित्रात भर चं पडेल. 
सर्वाना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्या. 

Friday, October 16, 2015

बाराखांबी/ सकलेश्वर, अंबाजोगाई. 

अगम्य, गूढ, अनाकलनीय
तरी हवेहवेसे . .
अतर्क्य, अस्पष्ट, धूसर
तरी मोहवणारे . .
आकाराचा आभास अस्पष्ट आहे.
वास्तूची जाणीव ही अशक्य आहे.
ती आहे एवढचं वास्तव आज आहे.
तिचं अस्तिव आज हि भान हरवणार आहे.
त्याची निर्मिती अफाट आहे.
बराखांबी/ सकलेश्वर मंदिराचा विचार करताना ही विचारांचा गोंधळ उडतो.
या अनाकलनीय गूढ वस्तूचा अर्थ कोणीतरी सांगा, अश्या भांवनाचा कल्लोळ उठतो. त्याचा शिलालेख आहे, तो वाचला गेला आहे, त्याचा अभ्यास होतोय.
पण त्या मंदिराच्या परिसरात गेल्यास मनास भिडणाऱ्या या अगम्य कल्पनाचं काय हा प्रश्न राहतोच ? त्याच्या या अर्धवट राहण्यातचं त्या वस्तूची ओढ कायम असावी. 


Monday, June 1, 2015

Kedareshwar Temple, Dharmapuri, Beed

            Kedareshwar Temple is a thought provoking short film that stands to highlight the glorious architectural heritage in India and need for its preservation. The movie shows enchanting pictures of Kedareshwar temple of Dharmapuri in Beed district in Maharashtra. The magnificent scenes take you to the period Chalukyas.  Hundreds of temples show the surpassing excellence of Indian architecture.  Sculptures and paintings in temples have great value for humans from the ancient times; and we are responsible to protect these temples.  Abandoned temples symbolizes that the changing world shifted its belief from old to new. Surprisingly, in this despair, our ancestors shine with their remarkable artistic skills all over the world.

Kedareshwar Temple, Dharmapuri in Beed.

Awards 

  • 13th Pune International film festival 3rd award. 
  • The Best Film Award in the event The East Side Story at Dzma 2015. (Symbiosis Institute of Media and Communication)
Film Screening

  • 13th Pune International film festival, Pune. 
  • Mumbai International film festival, Mumbai. 
  • Aurangabad International film festival, Aurangabad. 
  • Pune Biennale, New art gallery, Pune.
  • Balgandharv Kaladalan, Pune. 
  • Tilak Maharashtra Vidyapith, Pune. 


Monday, March 2, 2015

केदारेश्वर मंदिर 

          पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोसव (Piff) आणी  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C) यांनी आयोजित केलेल्या लघुचित्रपट महोसवात धर्मापूरीच्या "केदारेश्वर मंदिर" या मंदिरावर केलेल्या चित्रपटाला तृतीय बक्षिस मिळाले. हा चित्रपट "मानवनिर्मित वारसा" या विभागात होते. तसेच सिम्बोसीस महाविद्यालायातील चित्रपट महोसवात उत्कृष्ट चित्रपटाचे पहिले बक्षिस मिळाले. 
 केदारेश्वर मंदिर हे ११ व्या शतकातील "कल्याणी चालुक्य" राजवटीतील एक उत्तम कोरीवकाम असलेले मंदिरशिल्प आहे. 
यातील कित्येक शिल्पे इतिहासकाराची आवडती शिल्पे आहेत.            
हा लघुचित्रपट "पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोसव" तसेच " मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोसव" आणी औरंगाबाद 
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोसव" या ठिकाणी तसेच पुण्यात अनेक आंतरराष्ट्रीय महोसवातून दाखवण्यात येतोंय. 


Saturday, February 7, 2015

Remains (Art Installation) at Pune Binnale - 2015.

           Today's Cultural Capital of Maharashtra Pune, situated on Mula - Mutha river banks has significantly stretched back its antiquity up to Homo erects Man. This man left his traces back through the stone tools he made. Earliest evidence of all of us (homo sapien sapien ) in Pune can be discovered through Paleolithic stone tools and microliths. This sporadic evidence clearly demonstrates that the area around Pune attracted mankind right from the beginning even when he was in the hunting gathering stage. Later from early historic period we can find evidences habitation material like brick wall and ceramic assemblages like Red ware and Black ware and shell bangles. These vessels of various type that are used for daily activities such as cooking and storage. These vessels are useful indicators of the technological development, food habits, artistic and aesthetic qualities, trade patterns and general economic conditions in the past. Presence of cattle, domestic buffalo, goat, wild pig, spotted deer, hare, porcupine and peafowl revelled through animal skeletal remains found in Pune. Later in Shilahar Period i.e. 10 C A.D. we can find clear mention of “Punaka Vishay” in the copper plate he issued. These archaeological records gives historicity of settlement that Pune was not only a settlement but was a township spread over a large area much before it was thought
to exists.
Here we tried to express the historicity of Pune through Remains.

आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन.  मनोहर अंबानगरी टिम तर्फे त्या आठवणींना उजाळा.  https://www.youtube.com/watch?v=Og_WymOAXM...